Sleep Apnea उपचार न केल्यास आरोग्याला काय धोका निर्माण होतो?
Sleep Apnea म्हणजे काय?
माणसाच्या आयुष्यात झोप ही सर्वात महत्वाची बाब आहे. दिवसभरचा थकवा, ताणतणाव झोपेमुळे निघून जातो. पण कधी कधी झोपेमध्ये समस्या निर्माण झाली तर ? या समस्येला स्लीप अपनिया(Sleep Apnea)असे म्हणतात. स्लीप अपनिया म्हणजे काय , स्लीप अपनियावर उपचार(Sleep Apnea Treatment) कसे केले जातात याविषयी समजून घेऊयात.
Sleep Apnea उपचार ( Sleep Apnea Treatment in Marathi):-
स्लीप अपनिया (sleep apnea) ही एक समस्या आहे ज्यामध्ये व्यक्ती झोपेत असताना त्याचा श्वास काही काळ थांबतो. या काळात त्यांच्या शरीराला पूर्ण ऑक्सिजन मिळत नाही. श्वास सोडल्यावर त्याचे डोळे उघडतात आणि जाग येताच तो वेगाने श्वास घेऊ लागतो. यात काही लोकांचा तर झोपेत
श्वासोच्छ्वास बंद पडलाय हे कळतही नाही. त्यामुळे त्यांचा श्वास वेगाने चालतो आणि त्यांना विचित्र अस्वस्थता जाणवते. हे म्हणजे घोरण्यासारखेच आहे. ज्यामध्ये अनेकांना झोपेत घोरले होते हेही कळत नाही.
स्लीप एपनियावर वेळीच उपचार केले नाहीत तर इतरही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ, रात्रभर झोपूनही सकाळी थकल्यासारखे वाटणे, दिवसभर सुस्त वाटणे, मानसिक समस्या, पचन व्यवस्थित न होणे, स्मरणशक्तीवर परिणाम, बद्धकोष्ठता, तसेच हृदयविकार,मधुमेह असे आजार होऊ शकतात.
1. हृदयरोगाचा धोका:-
स्लीप एपनियाचा हृदयावरही परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला खूप काळ स्लीप एपनिया (sleep apnea) असेल तर त्यावर उपचार करणे आवश्यक असते. स्लीप एपनिया मेटाबॉलिक सिंड्रोमशी जोडला गेला आहे. स्लीप एपनियामुळे हृदयाचे आजार होऊ शकतात. या स्थितीत रक्तदाब आणि खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते.
२. यकृताचे नुकसान:-
जर तुम्हाला झोपेत श्वास घेण्यात अडथळे येत असतील तर तुम्हाला यकृताशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. स्लीप एपनियाचा उपचार न केल्याने फॅटी लिव्हर होऊ शकतो.
३. श्वास लागणे:-
स्लीप एपनियाचा तुमच्या श्वसनसंस्थेवर परिणाम होतो. झोपेत असताना शरीराला ऑक्सिजन मिळाले नाही तर दम्याचा त्रास होऊ शकतो.
४. स्ट्रोकचा धोका वाढतो:-
स्लीप एपनियामुळे हृदयावरील दाब वाढतो. त्यामुळे अचानक स्ट्रोकचा धोकाही वाढतो.
५ . सुन्न होणे आणि मुंग्या येणे:-
स्लीप एपनिया असलेल्या व्यक्तीचा मेंदू श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवणाऱ्या स्नायूंना सिग्नल पाठवण्यात अयशस्वी होऊ शकतो, ज्यामुळे श्वास घेण्यात अडचण येते. शरीरात सुन्नपणा आणि मुंग्या येणे ही उपचार न केलेल्या स्लीप एपनियाची लक्षणे असू शकतात. म्हणजेच स्लीप एपनियामुळेही न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात.
या व्यतिरिक्त डोकेदुखी, सकाळी चिडचिड होणे ही स्लीप एपनियाची सामान्य लक्षणे असू शकतात. त्यामुळे वरील धोके टाळण्यासाठी तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला स्लीप एपनियावर(sleep apnea)उपचार हवे असल्यास, तुम्ही पुणे येथील डॉ. सीमाब शेख यांचा सल्ला घ्यावा.
डॉक्टर माहिती – डॉ. सीमाब शेख- Sleep Apnea Specialist in Pune
डॉ. सीमाब शेख हे देशातील सर्वोत्तम ENT विशेषज्ञांपैकी एक म्हणून ओळखले जातात. डॉ. सीमाब शेख यांनी त्यांचे वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण बी.जे. मेडिकल कॉलेज आणि ससून जनरल हॉस्पिटल, पुणे येथून 1993 मध्ये पूर्ण केले. त्यांना 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे ज्यामध्ये त्यांनी हजारो शस्त्रक्रिया केल्या आहेत. नाकाची ऍलर्जी, सायनुसायटिस आणि सायनस-संबंधित समस्यांच्या क्षेत्रामध्ये उपचार करण्यात त्यांना आवड आहे.तसेच त्यांनी त कानाशी संबंधित रोग आणि बहिरेपणा-संबंधित समस्यांच्या मोठ्या संख्येने उपचार आणि यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांनी अतिशय अवघड समजल्या जाणाऱ्या अनेक केसेसवर यशस्वीरित्या उपचार केले आहेत. त्याचे क्लिनिक पुण्यातील एमजी रोडच्या अगदी मध्यभागी, पूलगेटजवळ आहे.